सत्तारांचे स्वपक्षीय विरोधक कोण ?

काही महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा संदर्भ देत महोत्सवाच्या आदल्या दिवशी त्यावरुन सत्तार यांना औरंगाबाद येथील एका आमदारास टीकेचे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

सिल्लोड येथील कृषी, कला व क्रीडा महोत्सवातील ‘वसुली वाद’ हा विरोधकांनी घडवून आणला असून गेल्या विधिमंडळ अधिवेशनातील अर्ध्यापेक्षा अधिक कामकाजात टीकेच्या केंद्रस्थानी असल्याने आता ‘अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्ता’ ही पूर्वीची प्रतिमा बदलून ‘नेते पद’ मिळत असल्याची भावना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली. महोत्सवातील वादावर पांघरुण घातले जावे अशा पद्धतीने ‘ मुख्यमंत्र्यांच्या घरातील चर्चा फुटतातच कशा’ असा नवा सवाल उपस्थित करत आपल्याच पक्षातील नेते आपली बदनामी घडवून आणत असल्याचा त्यांनी आरोप केला होता. त्या नेत्याचे नाव घेणार नाही. मुख्यमंत्र्यांना त्या नेत्याविषयी सारे माहीत असल्याचे रविवारी त्यांनी सांगितले.